"मानवी देह व योग-प्राणायाम"
मानवी देहाचा मूलस्त्रोत म्हणजे "जीवात्मा" जो ह्या पृथ्वीतलावरील चौर्यांशी दशलक्ष जीवात्म्यां पैकी एक आहे. गर्भावस्थेपासून स्वतंत्र अस्तित्व अनुभवलेल्या ठराविक टप्यांमधून विकसित होत जातो. जसं पृथ्वीतलावर दोनतृतीयांश पाणी तसंच मानवी देहात सुध्दा तेवढ्याच प्रमाणात असून त्याच्या शुध्दतेवर अवलंबून असते आरोग्य!
षड्विकार तसेच ताणतणाव, पर्यावरणाचा असमतोल व निकृष्ट दर्जाचा आहार विहार ह्या कलियुगातील अविभाज्य घटकांमुळे देहातील पाणी अशुद्ध होते. त्याचेच पर्यवसान विविध प्रकारच्या व्याधींच्या रूपांत होते.
इतर जीवात्म्यांपेक्षा मानवी "प्रसन्न मन" बुद्धीच्या विचारसरणी वर अवलंबून असल्याने चांगल्या संस्कारक्षम कुटुंबातील वातावरण व शिक्षणाणे मानवजातीयेणाऱ्या उध्दार उत्तम होत जातो. त्यामुळे उत्तोमोत्तम परोपकारी कार्य विविध क्षेत्रात सहजरीत्या पार पडली जातात. त्यातूनच नकळत सदृढ शरीररूपी खरी "धनसंपदा" वाढत जाते. हीच आयुष्यातील उत्तरार्धात सुध्दा साथ देते. उत्तम आयुष्य विनासायास व तक्रारविना पुर्णत्वाला प्राप्त नेण्याची क्षमता बाळगायला,  शारीरिक व मानसिक शुद्धीकरण करायला उत्तम आहार आणि विहार जपून सतत मार्गदर्शन घेत रहाणं गरजेचे आहे. तरच सर्वार्थाने मानवी जीवात्मा धारण केल्याचं जीवन सार्थकी लागेल. त्यासाठी जगाच्या पाठीवर इतिहास घडविला जाणारा भारतीय योग-प्राणायाम येणाऱ्या २१जूनला पांच वर्षे पूर्ण करत आहे. सातत्याने मी सुद्धा निवृत्तीनंतर गेल्या सात वर्षांपासून "इंद्रसेन योग विद्या केंद्र चिंचवड" सदस्यांबरोबर यथाशक्ती केल्याने अमुलाग्र बदल घडवून आणले. गेल्या वर्षभरात योग साधनेनंतर तळहातावर तेल लावून "विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जय हरी ॐविठ्ठला" नामाचा गजर करून तीन मिनिटे टाळ्या वाजवल्या मुळे रक्तातील Hbचे प्रमाण वाढले व हृदय कार्यक्षमतेत सुध्दा सुधारणा झाली. तेव्हा  नव्यानं सुरुवात करू इच्छिणाऱ्यांना मनापासून शुभेच्छा!
१७ एप्रिल २०१९..राम चौरे ९८२२३७०८८१

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा